Friday, May 3, 2024
Homeनगरपद्मश्री पोपटराव पवार यांना जीवन गौरव पुरस्कार

पद्मश्री पोपटराव पवार यांना जीवन गौरव पुरस्कार

शिरसगाव (वार्ताहर) –

भूमी फाउंडेशनच्या या वर्षीचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सामाजिक क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले हिवरेबाजारचे

- Advertisement -

आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यस्तरीय शौर्य पुरस्कार पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, कोव्हिड योध्दा म्हणून पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे, राज्यस्तरीय उत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार मनोहर गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे.

सदर पुरस्कार संस्थेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती भूमि फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांनी दिली.

या पुरस्कार मिळालेल्यांचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग पुणे संगीता डावखर, प्रांत अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तहसीलदार राहुल गायकवाड, अधिव्याख्याता गोविंद इसानकर, इन्स्पेक्टर महिला व बालकल्याण आयुक्तालय मोहन सरगर, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सेवानिवृत्त प्राचार्य टी. ई. शेळके, पत्रकार बी. आर. चेडे, वर्ल्ड पार्लमेंट सचिव भाऊराव माळी, सदस्य भीमराज बागुल, महाराष्ट्र संपादक परिषद कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, डॉ. बाबुराव उपाध्ये, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, आदींनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या