Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : दागिणे चोरणार्‍या चार महिलांना अटक

Crime News : दागिणे चोरणार्‍या चार महिलांना अटक

गणेशवाडी |वार्ताहर|Ganeshwadi

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणार्‍या चार महिलांना सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 23 रोजी अलका नारायण सुरुडकर रा. नवामोठा गोकुळनगर जालना या दुपारी तीन वाजता घोडेगाव चौफुला येथे संभाजीनगरकडे जाणार्‍या बसमध्ये चढत असताना एका महिलेने गळ्यातील मंगळसूत्राची चोरी केली. प्रतिकार केला तरीही तिच्यासोबत असणार्‍या आणखी तीन ते चार जणींनी मिळून गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे साठ हजार रुपये किंमतीच्या मंगळसूत्राची चोरी केली असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. महिलेने आरडाओरड केली. तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या काही पोलीस कर्मचार्‍यांनी लगेच बस थांबवत संशयित चार महिलांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची झडती घेतली असता चोरी केलेले सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र मिळून आले.

YouTube video player

दाखल फिर्यादीवरुन आरोपी सखुबाई भानुदास जाधव, मुक्ताबाई आवेश जाकने (दोघी रा. मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर), कांताबाई अमोल शिंदे, संगिता ऊर्फ रेश्मा गणेश शिंदे (दोघी रा. रेल्वे स्टेशन जवळ छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरुध्द गुन्हा र. नं. 314/2025 बीएनएसचे कलम 307, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 25 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...