Thursday, May 2, 2024
HomeUncategorized5जी स्मार्ट फोन तीन हजार रुपयांमध्येच

5जी स्मार्ट फोन तीन हजार रुपयांमध्येच

नवी दिल्ली

रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी एक मोठा धमाका केला जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीस भारतात 5जी स्मार्टफोनची किंमत २७ हजार रुपयांपासून पुढे आहे.

- Advertisement -

5 हजार रुपये किंमत असलेला 5जी स्मार्ट फोन आता अडीच ते तीन हजार रुपयांमध्येच ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती, कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. कंपीनेच लक्ष 2जी चा वापर करणाऱ्या २० ते ३० कोटी युजर्सवर आहे. सुरुवातीस 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5जी स्मार्ट फोन आणण्याचा विचार आहे. त्यानंतर मागणी वाढल्यास त्याची किंमत आणखी कमी करून 2 हजार 500 ते 3000 रुपये केली जाऊ शकते. मात्र, यासंबंधी अद्याप जिओकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

देशात पहिल्यांदा 4जी मोबाइल जिओने लॉन्च केला होता. १५०० रुपये रिफंडेबल डिपॉझिट केल्यानंतर जिओकडून ग्राहकांना हा फोन मोफत देण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या