Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजJitendra Awhad : पोलिस अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?; फोटो...

Jitendra Awhad : पोलिस अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?; फोटो ट्विट करत आव्हाडांनी बॉम्ब फोडला

मुंबई । Mumbai

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीकडे तपासाची सूत्रे आहेत. तर, दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर शंका उपस्थित केली जात आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधीमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे. आव्हाड यांनी म्हटले की, संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? असा सवालही आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याच विघ्ने याने निवडणूक काळात धनंजय मुंडेचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केले असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.

दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेही वारंवार पत्रकार परिषद घेत आहेत. सध्या प्रकरणात सात आरोपींपैकी सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पण एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मात्र, या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि दहीफळे यांची कॉल रेकॉर्डिंग तपासावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. ज्यानंतर आता सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी बजरंग सोनवणेंविरोधातच वादग्रस्त पोस्ट लिहून ती व्हॉट्सअप या सोशल मीडियावरील एका ग्रुपमध्ये पोस्ट केली आहे. ज्यामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी (ता. 03 जानेवारी) मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि दहीफळे यांची कॉल रेकॉर्डिंग तपासावी, अशी मागणी केली. त्यानंतर शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केली. “या खासदाराची *** जागेवर राहणार नाही, मी प्रेस घेतली तर…,” असे वादग्रस्त मुंडे यांनी या पोस्टच्या माध्यमातून लिहिले. यावेळी पोलीस अधिकारी मुंडे यांना त्या खासदाराचे नाव देखील विचारण्यात आले. पण लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी गणेश मुंडे यांना सदर ग्रुपमधून काढून टाकले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...