Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशसुरक्षा दलाला मोठं यश! लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवाद्यांना कंठस्नान

सुरक्षा दलाला मोठं यश! लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवाद्यांना कंठस्नान

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) श्रीनगर शहर सुरक्षा दलांनी (Indian Army) शुक्रवारी मोठी कारवाई केली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा आणि टीआरएफचे (TRF) दोन दहशतवाद्यांना (Terrorist) कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.

- Advertisement -

‘डिजिटल’ आणि ‘क्रिप्टो’करन्सीमधील फरक काय?, वाचा…

मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांकडून २ पिस्तुलांसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. आयजीपी काश्मीर यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, नागरिकांवर, विशेषत: अल्पसंख्याक समुदायातील लोकांना लक्ष्य करून, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी खोऱ्यात बंडखोरीविरोधी कारवाया तीव्र केल्या आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैशचा प्रमुख कमांडर जाहिद वानी ठार केला.

मोस्ट वॉन्टेड ‘अबू बकर’ला UAE मधून अटक; मुंबई बॉम्बस्फोटानंतर होता फरार

शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत इकलाख हजमलाही पोलिसांनी ठार केलं. विशेष म्हणजे अनंतनागच्या हसनपोरा येथील एचसी अली मोहम्मद यांच्या हत्येत हजमचाही हात होता. याआधी बुधवारीच सुरक्षा दलांना मोठे यश मिळालं होतं. यादरम्यान चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला.

नुकतेच गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर आतापर्यंत ४३९ दहशतवादी मारले गेले आहेत. या कालावधीत केंद्रशासित प्रदेशात ५४१ दहशतवादी घटनांची नोंद झाली आहे. तसेच, या घटनांदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. मात्र, वैयक्तिक मालमत्तेचे सुमारे ५.३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

चलनातून बाद झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा साईंच्या दानपेटीत

- Advertisment -

ताज्या बातम्या