Sunday, September 15, 2024
Homeनगरन्यायाधीशांच्या कमी संख्येमुळे न्यायालयीन कामकाजाचा ताण अधिक - न्या. तोष्णीवाल

न्यायाधीशांच्या कमी संख्येमुळे न्यायालयीन कामकाजाचा ताण अधिक – न्या. तोष्णीवाल

बेलापूर |प्रतिनिधी| Belapur

- Advertisement -

आपापसात होणारे मतभेद हे वादाचे मुख्य कारण असून या कारणामुळेच न्यायालयात खटले (Lawsuits in court) जास्त तर न्यायाधिशांची (Judge) संख्या कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे न्यायालयावर (Court) कामाचा ताण येत असल्याचे मत तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 व सहाय्यक सत्र न्यायाधिश बी. बी. तोष्णीवाल (Judge B. B. Toshniwal) यांनी व्यक्त केले.

तालुका विधी सेवा समिती श्रीरामपूर (Shrirampur), वकील संघ व बेलापूर ग्रामपंचायतीच्या (Belapur Grampanchayat) संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश श्री. तोष्णीवाल (Judge B. B. Toshniwal) बोलत होते. ते पुढे म्हणाले, मतभेदातून होणारे वाद जागेवरच मिटले पाहीजे.त्याकरीता मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवाणी, फौजदारी, महीला विषयक कौटुंबिक वाद (Family disputes) मध्यस्थामार्फत सोडविले जातील. त्यामुळे वेळेची बचत होईल. कायद्याने आता मुलाप्रमाणेच मुलींनाही समान अधिकार दिले आहेत. अनेकांना आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाता येत नाही. त्यांना कायदेविषयक ज्ञान देण्याकरीता या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून असे उपक्रम वर्षभर सुरु राहणार आहेत.

2 रे सह दिवाणी न्यायाधीश सौ. एस. व्ही. मोरे म्हणाल्या की, समाजात महीलांवरील अत्याचारात दररोज वाढ होताना दिसत आहे. केवळ अशिक्षित लोक हे गुन्हे करतात असे नाही, सुशिक्षित, कायद्याचे ज्ञान असणारे लोकही गुन्हे करत आहेत हे दुर्दैव म्हणावे लागेल. बालविवाहाचा कायदा झाला असतानाही बालविवाह होतात ही शोकांतीका आहे. महीलांना पोटगीचा अधिकार दिलेला आहे. अनेक कायदे हे नागरीकांच्या भल्यासाठी केले जातात, परंतू काही ठिकाणी त्याचा गैरवापर केला जातो. या सर्वावर नियंत्रण आणावयाचे असेल तर प्रत्येकाने आपल्या मुलावर, कुटुंबावर चांगले संस्कार करण्याची गरज आहे.

यावेळी जि. प. सदस्य शरद नवले यांनी मनोगत व्यक्त केले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. पी. पी. गटणे, पोलीस निरीक्षक संजय सानप, अ‍ॅड. एस. आर. बिहाणी, अ‍ॅड. जगन्नाथ राठी, अ‍ॅड. सुहास चुडीवाल, अ‍ॅड. मनिषा वर्मा, अ‍ॅड. पंकज म्हस्के, अ‍ॅड. ईजाज शेख, अ‍ॅड. अविनाश भोकरे, अ‍ॅड. वैभव खंडागळे, अ‍ॅड.अमोल भोकरे, अ‍ॅड. सुनिल कपुर, अ‍ॅड. सुनिल शेळके, मुस्ताक शेख, रमेश अमोलीक, शफीक बागवान, विधी व न्याय समितीचे दिलीप थोरात, संदीप शेरमाळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, हवालदार अतुल लोटके, रामेश्वर ढोकणे, निखील तमनर, हरीश पानसंबळ, गणेश भिंगारदे, कामगार तलाठी हडोळे, मिलींद दुधाळ, अरुण आमोलीक, दादा कुताळ, मोहसीन सय्यद, नितीन नवले, देविदास देसाई, दिलीप दायमा, विष्णूपंत डावरे उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच महेंद्र साळवी यांनी केले तर अ‍ॅड. जिवन पांडे यांनी सूत्रसंचलन केले. उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या