Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड

Nashik News : नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड

नाशिक | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik APMC) सभापती देवीदास पिंगळे (Devidas Pingale) यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव १५ विरुद्ध ० ने मंजूर झाल्यानंतर, आज (दि. १९) नवीन सभापती निवडीसाठी निवडणूक (Election) पार पडली. यावेळी सभापतीपदी कल्पना चुंभळे (Kalpana Chumbhale) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

सभापतीपदासाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे आणि कल्पना चुंभळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध (Unopposed) निवड झाली. सभापती देवीदास पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत संचालकांनी एकत्र येत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. पिंगळे यांच्या गटातीलच काही नाराज संचालक माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली आले आणि नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली.

याचा परिणाम म्हणून पिंगळे यांच्याविरोधात विशेष सभेत ठराव मांडण्यात आला, जो १५ विरुद्ध ० अशा एकतर्फी मतांनी मंजूर झाला. या घडामोडींमध्ये काही संचालक सहलीवर गेले होते, मात्र मंगळवारी (दि. १८) दुपारी हे संचालक नाशिकमध्ये (Nashik) परतले होते. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता थेट बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. यानंतर सभापतीपदासाठी अर्ज मागविण्यात आले असता कल्पना चुंभळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदी (Chairmanship) निवड करण्यात आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...