Friday, May 3, 2024
Homeनगरसाईभक्त तसेच शेतकरी बांधवांना विविध सुविधा मिळाव्यात

साईभक्त तसेच शेतकरी बांधवांना विविध सुविधा मिळाव्यात

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीलगत असलेली शेती महामंडळाची 300 एकर जमीन साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात देऊन त्या ठिकाणी भव्य गार्डनचा प्रकल्पाची उभारणी करावी. याबरोबरच विविध मागण्यांचे निवेदन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी आले होते. त्याप्रसंगी कमलाकर कोते यांनी निवेदन देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचेबरोबर चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे, शिर्डी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी दैनंदिन भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने भक्तांना सुविधा कमी पडत आहे. शिर्डी नजीक असलेली शिंगवे गावातील शेती महामंडळाची 300 एकर जमीन शासनाने साईबाबा संस्थानला देणगी म्हणून द्यावी. शेगावच्या धर्तीवर या 300 एकर जागेत भक्तांसाठी भव्य गार्डन प्रकल्प उभारला तर भक्तांना मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होईल. या ठिकाणी गार्डन झाले तर येथील परिसराला अधिक महत्त्व प्राप्त होईल व येथील अर्थचक्राला गती येईल.

याबरोबरच शिर्डीजवळ असलेल्या काकडी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू करावी. गोदावरी कालवा खोलीकरण व रुंदीकरणासाठी 200 कोटी निधी मिळावा. सावळविहीर ते अहमदनगर रस्ता तातडीने डांबरीकरण करावा. साईबाबा संस्थानमध्ये सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी करावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन कमलाकर कोते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या