मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतला सेन्सॉर बोर्डाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अभिनेत्री कंगना राणौतचा बहुचर्चित इमर्जन्सी चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाने कंगना यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ सिनेमा वादात सापडला होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देत कंगना यांना दिलासा दिला आहे. त: अभिनेत्रीने याबाबत सोशल मीडियातून माहिती दिली आहे. कंगानाने आपल्या इंस्टाग्राम स्टेटसला आणि ट्वटिरला इमर्जन्सी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे, ही माहिती देताना मला अत्यानंद होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर सेन्सॉर बोर्डानं इमर्जन्सी चित्रपटाबाबत घेतलेल्या आक्षेपानंतर दुरूस्ती होताच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी सेन्सॉरने U/A सर्टिफिकेटही दिले आहे. इमर्जन्सी चित्रपटाची तारीख जाहीर झाल्यानंतरही हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. त्यामुळे, चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, होणार की नाही याची चर्चा बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात रंगली होती.
चित्रपट प्रदर्शनापुर्वीच चित्रपटाला विरोध
अभिनेत्री कंगना रणौतचा इमर्जन्सी हा चित्रपट बराच काळ वादात अडकला होता. या चित्रपटाला अनेक ठिकाणी विरोध करत निदर्शने करण्यात आली होती. मात्र, आता अखेर चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) इमर्जन्सी चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. यासोबतच चित्रपटातील काही सीन्स काढून टाकावे लागतील, अशा स्पष्ट सूचनाही निमार्त्यांना देण्यात आल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा