Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकापडणीस बापलेक खून प्रकरण : राहुल जगतापच्या अलिशान रेंज रोव्हरचा जुना मालक...

कापडणीस बापलेक खून प्रकरण : राहुल जगतापच्या अलिशान रेंज रोव्हरचा जुना मालक बॉलीवूड अभिनेता?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने पैशाच्या हव्यासापोटी एकाने पंडित कॉलनी (Pandit Colony) परिसरात ठराविक दिवसांच्या अंतराने बाप आणि लेकाचा खून (Murder of father and son ) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संशयित आरोपी राहुल जगताप याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत…

- Advertisement -

धक्कादायक घटनेचा अधिक तपास सरकारवाडा पोलिस (Sarkarwada Police Station ) करत आहेत. यातील मयत नानासाहेब रावजी कापडणीस (Nanasaheb Ravji Kapdnis) व अमित नानासाहेब कापडणीस ( Amit Nanasaheb Kapdnis) अशी खून झालेल्या बापलेकाची नावे आहेत.

दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेल्या राहुल जगताप याची चौकशी सुरु असताना त्याने खरेदी केलेली आलिशान रेंज रोव्हर कार एका बड्या बॉलीवूड अभिनेत्याची असल्याचे समजते.

मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने बापलेकाचा खून

या आलिशान गाडीचा पहिला मालक जॉन अब्राहम हा असल्याची माहिती आरोपी राहुल जगताप याने पोलिसांना दिली आहे. कापडणीस यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या पैशांतून आरोपीने ही गाडी खरेदी केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.

राहुल जगताप याने कारच्या जुन्या मालकाबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरटीओकडून गाडीच्या कागदपत्रांची माहिती घेण्यास सुरुवात केल्याचे समजते. दरम्यान, राहुल जगताप याच्या बोलण्यात किती तथ्य असावे हे मात्र संपूर्ण चौकशीअंती समोर येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत अधिकृतरित्या कुठलीही माहिती दिलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या