Monday, September 28, 2026
Homeनगरकरजगाव येथे दोन तास जोरदार पाऊस

करजगाव येथे दोन तास जोरदार पाऊस

करजगाव |वार्ताहर| Karajgav

नेवासा तालुक्यातील मुळाकाठ परिसरातील करजगाव, पानेगाव, शिरेगाव, अंमळनेर सह परिसरात जोरदार वार्‍यासह रविवारी साडेचारच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. तो सातपर्यत चालू होता. करजगाव-पानेगावमध्ये सुमारे दोन तास पावसाने तांडवच मांडले होते.ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र पाणीच पाणी वाहत होते. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे अनेकांची धावपळ उडाली. त्याचप्रमाणे मुळाकाठ परिसरात समाधानकारक पाऊस झाला. जोरदार पाऊस व वार्‍यामुळे वीजही गायब झाली होती.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून असह्य उकाडा होता. कडक उन्हामुळे पिके पाण्यावर आली होती. पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान काल सायंकाळी नेवासा व नेवासाफाटा परिसरातही जोरदार पावसाने पिकांना दिलासा मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...