Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजनतैमूर दादा झाला; करीना आणि सैफच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

तैमूर दादा झाला; करीना आणि सैफच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

मुंबई l Mumbai

पुन्हा एकदा एकदा पटौदी कुटूंबात आनंदाची लाट पसरली आहे. अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) आज पुन्हा एकदा पालक बनले आहेत. बेगम करीनाने आज तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे.

- Advertisement -

शनिवारी रात्री करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. रविवारी (21 फेब्रुवारी) सकाळी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करिना कपूरची चुलतबहीण रिधिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियावर सैफ आणि करिना यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सैफची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सबाने सैफचा एक जुना फोटो शेअर केला होता. यात त्याच्यासोबत लहान इब्राहीमही दिसत आहे. ‘हा एक छोटासा इशारा आहे, माझे चॅम्प’, असे कॅप्शन या फोटोसाबत लिहले होते. त्यामुळे करीनाला पुन्हा मुलगाच होणार, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.

सध्या सोशल मीडियावर या जोडीची आणि त्यांच्या बाळाची चर्चा सुरु आहे. यामध्येच या नव्या चिमुकल्याचं नेमकं नाव काय असेल ही उत्सुकतादेखील चाहत्यांना लागली आहे. त्यातच तैमुरच्या नावाप्रमाणेच या बाळाचं नावदेखील असंच काहीसं असेल का असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. दरम्यान करीना आणि सैफ या जोडीला यापूर्वी तैमुर हा मुलगा असून त्याच्या नावावरुन सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला होता. त्याच्या नावावर अनेकांना आक्षेप घेतला होता. इतकंच नाही तर सैफने तैमुरचं नावदेखील बदलण्याचा विचार केला होता, असं सांगण्यात येतं.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....