Saturday, October 3, 2026
Homeनगरकर्जत तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका; सिद्धटेकचा पूल पाण्याखाली, प्रशासन सतर्क

कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका; सिद्धटेकचा पूल पाण्याखाली, प्रशासन सतर्क

कर्जत । प्रतिनिधी

खडकवासला धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा वेगाने विसर्ग सुरू असल्यामुळे कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

नगर-पुणे जिल्ह्याला जोडणारा अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेक येथील गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेला भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे पुणे- मुंबई भागातून या मार्गाने येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येण्यात अडचण निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, भांबोरा, शिंपोरा, गणेशवाडी, खेड व नदीकाठच्या इतर गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कर्जत पोलीस, महसूल व आपत्कालीनची पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, तहसीलदार बिराजदार यांनी सिद्धटेक येथे जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी सिद्धटेक येथील पुलावर तैनात करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...