Monday, May 6, 2024
HomeनगरKarjat Bazar Samiti : रोहित पवार कि राम शिंदे? कोण राखणार गड?...

Karjat Bazar Samiti : रोहित पवार कि राम शिंदे? कोण राखणार गड? कर्जत बाजार समितीत आज होणार चित्र स्पष्ट

कर्जत (प्रतिनिधी)

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडी रविवारी (दि.11) होणार आहे. सभापवतीपदी कोणाची वर्णी लागणार, कोण बाजी मारणार, दैव चिठ्ठी की स्पष्ट बहुमत, घोडेबाजार होणार का, आमदार रोहित पवार की आमदार राम शिंदे याविषयी सध्या जोरदार चर्चा कर्जत तालुक्यामध्ये सुरू आहे. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

- Advertisement -

निवडणुकीमध्ये नामनिर्देशक पत्र वाटप व स्वीकृती दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत. छाननी दीड ते एक पंचेचाळीस , वैध यादी प्रसिद्ध दोन वाजता, अर्ज माघार घेण्यासाठी दोन वाजून पंधरा मिनिटापर्यंत मुदत राहील. अंतिम उमेदवारी दोन वाजून वीस मिनिटांनी जाहीर करण्यात येणार आहे. आवश्यक वाटल्यास मतदान प्रक्रिया दोन ते तीन वाजे पर्यंत, आवश्यक वाटत असल्यास मतमोजणी प्रक्रिया तीन ते तीन 15 व निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांच्या निकाल दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी जाहीर करण्यात येणार आहे.

Sharad Pawar : शरद पवारांनी भाकरी फिरवलीचं, जाहीर केली राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची नावे

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार व माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहावयास मिळाला. दोघांनीही निवडणूक जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दोघांनाही समान म्हणजे प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी झाली होती. मात्र यामध्ये काहीही फरक पडला नाही. दोन्हीही गटांना समान जागा असल्यामुळे कोण बाजी मारणार याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. सदस्य संख्या समान आहे यामध्ये जर फूट पडली नाही तर देवी चिठ्ठी कोणाच्या नावाची निघणार याविषयी चर्चा सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या