Thursday, March 27, 2025
Homeनाशिकशांतीगिरी महाराजांच्या हस्ते आज रासाका शुभारंभ

शांतीगिरी महाराजांच्या हस्ते आज रासाका शुभारंभ

पालखेड मिरचीचे | प्रतिनिधी

स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगामाचा शुभारंभ आज मंगळवार (दि.३१) सकाळी ९ वाजता श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या हस्ते व आमदार दिलीप बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, व्हा.चेअरमन अरविंद जाधव, कार्यकारी संचालक गणेश बनकर, जनसंपर्क संचालक दिनेश बागरेचा यांनी दिली.

- Advertisement -

स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने भाडेतत्त्वावर सुरू केलेल्या रानवड सहकारी साखर कारखान्याचे मागील दोन हंगाम यशस्वीपणे पार पडले असून येत्या हंगामात कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेला इथेनॉल प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

पुढील गळीत हंगामाच्या शुभारंभास सुरुवात होत असून निफाड तसेच इतर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, संस्थेचे सभासद, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ATM : चाेरट्यांनी एटीएम मशिन पळविले

0
नाशिक। प्रतिनिधी Nashik एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही कॅमेरे जाळून चाेरट्यांनी एटीएम मशिन चाेरुन नेले आहे. ही घटना मुंबई नाका पाेलिसांच्या हद्दीतील विनयनगर परिसरात घडली असून मशिनमध्ये...