दिल्ली : कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतचा निकाल पाहता जनादेश भाजपच्या बाजूने आहे. भाजपने ०६ जागा जिंकल्या असून आघाडीवर आहे. त्याचवेळी कॉंग्रेसने केवळ एक जागा जिंकली असून एका जागेवर आघाडी घेतली आहे.
दरम्यान कर्नाटक विधानसभा पोटीनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडत आहे. एकूण १५ विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक पार पडली होती. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभा सभागृहातील तब्बल १७ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर या ठिकाणी फेरनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत भाजपाला आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी किमान 6 जागांवर विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे होते, ते ध्येय त्यांनी साध्य केले आहे.
तसेच एका विधानसभा जागेवर अपक्ष आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेसने आपला पराभव स्वीकारला असून आम्ही मतदारांचा प्रतिसाद स्वीकार करीत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.