Thursday, May 2, 2024
HomeनगरVideo : करोनामुक्त गाव स्पर्धेने जनजागृती वाढेल - पोपटराव पवार

Video : करोनामुक्त गाव स्पर्धेने जनजागृती वाढेल – पोपटराव पवार

अहमदनगर | Ahmednagar

करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अजूनही कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये कोरोना संदर्भात जनजागृती वाढावी यासाठी राज्य सरकारने नामी शक्कल लढवली आहे.

- Advertisement -

सरकारने ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धेची घोषणा केली आहे. यात प्रथम क्रमांक पटकावणार्‍या गावाला तब्बल 50 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच गावातील विकास कामासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेमुळे ग्रामीण भागामध्ये करोना बाबतची जनजागृती वाढेल, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलेलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या