Thursday, May 2, 2024
Homeनगरकरुले शिवारात बिबट्या जेरबंद

करुले शिवारात बिबट्या जेरबंद

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) करुले (Karule) गावांतर्गतच्या कोल्हे वस्ती शिवारात वनविभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजर्‍यात (Cage) गुरुवारी (दि. 24) रात्रीच्या सुमारास अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद (Leopard) झाला. बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाल्याचे समजताच रहिवाशी व ग्रामस्थांनी बिबट्यास (Leopard) बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

- Advertisement -

करुले (Karule) शिवारात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी (Farmer) व रहिवाशांना बिबट्याचे (Leopard) दर्शन होत होते. बिबट्याचे वास्तव्य लक्षात घेता परिसरात पिंजरा (Cage) लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर वनविभागाने (Forest Department) कोल्हे वस्ती शिवारात पिंजरा (Cage) लावला. दरम्यान गुरुवारी रात्री अंदाजे अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या (Leopard) पिंजर्‍यात जेरबंद झाला.

याबाबत कामगार पोलीस पाटील अशोक कोल्हे यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल एस. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रशांत पुंड, वनरक्षक आय. व्ही. जारवाल सहित वन कर्मचार्‍यांनी तातडीने कोल्हेवस्ती येथे येत सदर बिबट्यास निंबाळे येथील रोपवाटिकेत हलविले. सदर बिबट्यास बघण्यासाठी रहिवासी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्यास पिंजर्‍यात जेरबंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या