Sunday, April 27, 2025
Homeक्राईमकाष्टी, श्रीगोंदा शहर गुटखा तस्करीचे केंद्र

काष्टी, श्रीगोंदा शहर गुटखा तस्करीचे केंद्र

साठवणुकीचे गोदाम आता ग्रामीण भागात || प्रशासनाकडून डोळेझाक सुरू

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील काष्टी आणि श्रीगोंदा शहर हे गुटखा तस्करीचे केंद्र बनले आहे. याठिकाणी असणार्‍या विक्रेत्याकडून जिल्ह्यासह राज्यभर गुटख्याचा पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपासून तालुक्यातील गुटख्याच्या स्टॉकीस्ट यांनी मालाचे गोडावून शहराऐवजी ग्रामीण भागात थाटले आहेत. यामुळे पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभाग या गुटखा तस्कारांच्या मुसक्या कशा आवळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

तालुक्यात आठ दिवसांपासून अवैध व्यावसायिकांनी काही प्रमाणात आपले व्यवसाय आवरते घेतलेले असतांना गुटखा विक्री जोमात सुरु आहे. या व्यवसायात असणार्‍यांनी मालाचे गोडावूनचे ठिकाण बदले असून व्यवसायातील जुने पंटर पुन्हा जोमाने या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. श्रीगोंदा शहारासह तालुक्यातील खेडगावात दुकाना, दुकानात आणि छोट्या टपर्‍यांवर खुलेआम गुटखा विक्री होतांना दिसत आहे. परराज्यातूंन छुप्या मार्गाने येणारा आणि बंदी असलेल्या गुटख्याचा अवैध मार्गाने व्यवसाय करून त्यातून लाखो कमावण्यासाठी सरसावलेले तस्करावर आणि त्यांच्या चेलेचपट्यावर कारवाई करतांना कोणीच दिसत नाही.

उलट नवनवीन यंत्रणा आणि दुचाकी, चारचाकीमधून गुटख्याची तस्करी सुरू आहे. या कामात बेरोजगारांना हेरून त्यांना कामाचे आणि पैशाचे आमिष दाखवून ओढले जात आहे. पोलीस पथक आणि औषध प्रशासन यांच्याकडे अनेकवेळा तक्रारीनंतर गुटख्याची तस्करी करणार्‍यांवर जुबजुबी कारवाई करून आपले काम संपवतांना दिसत आहे. त्यानंतर पुन्हा ही गुटखा विक्री जोमाने सुरू असून याचा कायमचा बंदोबस्त कोण करणार असा प्रश्न श्रीगोंदेकर विचारतांना दिसत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : “लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ…”; मंत्री...

0
मुंबई | Mumbai लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) बसलेल्या झटक्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लागू केली. या...