Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमतरुणावर केडगावात चाकूने हल्ला

तरुणावर केडगावात चाकूने हल्ला

हातउसने दिलेल्या पैशाची मागणी केल्याचा राग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी (16 ऑक्टोबर) मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास भूषणनगर, केडगाव येथे घडली. आकाश अशोक पवार (वय 27 रा. केडगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून संकेत पवार (रा. केडगाव) व त्याच्या तीन अनोळखी साथीदाराविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संकेत पवार याने फिर्यादीला बुधवारी रात्री दीड वाजता भूषणनगर येथील पाण्याच्या टाकी जवळ बोलून घेतले. फिर्यादी तेथे जाताच त्यांनी संकेतकडे हात उसने दिलेल्या पैशाची मागणी केली. याचा संकेतला राग आल्याने त्याने ‘नेहमी माझ्याकडे तुझे राहिलेल्या पैशाची मागणी करतो काय, आज तुझ्याकडे पाहतोच’ असे म्हणून शिवीगाळ करून संकेत व त्याच्या साथीदाराने मारहाण केली. फिर्यादी प्रतिकार करत असताना संकेतने त्याच्या कमरेला खोसलेला धारदार चाकू बाहेर काढून फिर्यादीवर हल्ला करत जखमी केले.

पुन्हा पैसे मागितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जखमी फिर्यादी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस अंमलदार विश्वास गाजरे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या