Thursday, May 2, 2024
Homeनाशिककेळझर धरण ओव्हर फ्लो; 38 गाव सुखावले

केळझर धरण ओव्हर फ्लो; 38 गाव सुखावले

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

गत चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने (heavy rain) आज काहीशी उघडकीप घेत विश्रांती घेतल्याने शहरातील विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होवू शकले.

- Advertisement -

ग्रामीण भागात देखील थांबलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना (farmers) दिलासा मिळाला आहे. पावसाने उसंत घेतल्यास थांबलेल्या खरिपाच्या पेरण्या (Kharif sowing) पुन्हा सुरू करण्याची लगबग शेतकर्‍यांतर्फे सुरू झाली आहे.

दरम्यान, पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे (heavy rain) चणकापूर धरणातून (Chanakapur Dam) 5 हजार 497 तर पुनदमधून 6 हजार 228 क्युसेक पाण्याचा विसर्ग (water discharge) सुरू असल्याने गिरणा नदीस (girna river) आलेल्या पुराची पातळी आज देखील जैसे थे होती. गत चार दिवसापासून गिरणास आलेल्या पुरामुळे गिरणा धरणात (girna dam) 12 हजार 481 द.ल.घ.फुट पाणीसाठा होवून धरण 70 टक्के भरले आहे. एक-दोन दिवस पुराचा प्रवाह जैसे थे राहिल्यास गिरणा शंभर टक्के भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येस बरसण्यास प्रारंभ झालेल्या पावसाने तीन दिवसातच सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण केली आहे. शहरातील सोयगाव, नववसाहत, डी.के. परिसर, भायगाव शिवार, कलेक्टरपट्टा, रमजानपुरा, द्याने आदी भागात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. भुमीगत गटारींच्या अर्धवट सोडून देण्यात आलेल्या कामांमुळे जनतेच्या त्रासात अधिक भर पडली असल्याने

मनपासह लोकप्रतिनिधींच्या कार्यपध्दतीवर जनतेत तीव्र नाराजीचा सुर उमटू लागला आहे. कोट्यवधींचा निधी (fund) खर्च करून बांधण्यात आलेले रस्ते पावसाच्या पहिल्या तडाख्यातच ठिकठिकाणी उखडले गेल्याने कामाचा नित्कृष्ट दर्जा उघड झाला असून कोट्यवधींचा हा निधी चिखलात गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरीकांतर्फे व्यक्त केली जात आहे.

पाणीसाठ्यात वाढ

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे (heavy rain) चणकापूर धरणात आज 1 हजार 266 द.ल.घ.फुट पाणीसाठा (52 टक्के) झाला असून आज 5 हजार 497 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला. पुनदमध्ये 663 द.ल.घ.फुट पाणीसाठा झाला असून 6 हजार 228 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गिरणा नदीच्या पुराची पातळी वाढली असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हरणबारी धरण शंभर टक्के भरल्याने आज 4 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग मोसम नदीपात्रात सुरू होता. नाग्यासाक्या धरणात 15 द.ल.घ.फुट पाणीसाठा झाल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या