केरळ | Kerala
केरळ (Kerala) राज्यातून एक दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. केरळच्या कासरगोड जिल्ह्यात (Kasargode District) सोमवार रात्री स्कूल बस आणि ऑटोरिक्षा (School Bus & Auto Riskshwa Accident) यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच महिलांचा (5 People Dead) मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बडियाडका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासानुसार बस चुकीच्या दिशेने वेगात जात होती. त्यामुळे हा अपघात झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. बस शाळकरी मुलांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर परतत होती. त्यामुळे बसमध्ये मुले नव्हती. दरम्यान, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ऑटोचालकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून लवकरच याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अपघातानंतर रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. या अपघातात स्कूल बस आणि ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्देवी म्हणजे अपघातात मृत झालेल्या चार महिला एकाच घरातील होत्या.