Sunday, May 19, 2024
Homeनगरपात्र माजी खंडकरी शेतकर्‍यांना 1 एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप होणार

पात्र माजी खंडकरी शेतकर्‍यांना 1 एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप होणार

राहाता |प्रतिनिधी| Rahata

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील पात्र माजी खंडकरी शेतकर्‍यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन देखील वाटप करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबई मंत्रालय येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील पात्र माजी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना 1 एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंत्रीमंडळाने मान्यता दिल्याचे विखे पाटील यांना सांगितले. या निर्णयामुळे 273 खंडकरी शेतकरी कुटुंबांना लाभ होऊन 172.23 एकर क्षेत्र देय करता येईल.

सन 2012 च्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील 1 एकरापेक्षा जास्त देय क्षेत्र असलेल्या 2 हजार 545 पात्र माजी खंडकरी शेतकर्‍यांना 24 हजार 95 एकर क्षेत्र वाटप करण्यात आलेले आहे. प्रमाणभूत क्षेत्राप्रमाणे 10 ते 20 गुंठे क्षेत्र देय असलेले 83 (क्षेत्र 32.29 एकर गुंठे) व 21 ते 40 गुंठे क्षेत्र देय असलेले 190 (क्षेत्र 139.34 एकर गुंठे) खंडकरी आहेत. शासन अधिसूचना दिनांक 8 ऑगस्ट 2023 अन्वये प्रमाणभूत क्षेत्रात सुधारणा करुन ते बागायती जमिनीसाठी 10 गुंठे व जिरायती जमिनीसाठी 20 गुंठे असे करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या