Monday, August 17, 2026
HomeनगरAhilyanagar : पिकविम्यासाठी पुन्हा मुदतवाढ

Ahilyanagar : पिकविम्यासाठी पुन्हा मुदतवाढ

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांसाठी आजची शेवटची तारीख

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकर्‍यांना जिल्हानिहाय 17 ते 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांना आज 17 ऑगस्टपर्यंत पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री पीकविमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या पीक नुकसानीपासून शेतकर्‍यांना आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. खरीप हंगाम 2026 साठी ही योजना 3 जुलै रोजी कार्यान्वित करण्यात आली होती. योजनेत सहभागी होण्याची नियमित अंतिम मुदत 31 जुलै होती. मात्र, यंदा पाऊस उशिरा आल्याने पेरण्या लांबल्यामुळे सर्व शेतकर्‍यांसाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्हानिहाय अंतिम मुदत
17 ऑगस्ट : अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली.
20 ऑगस्ट : सोलापूर, जळगाव, सातारा, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे.
31 ऑगस्ट : परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, धाराशिव, लातूर, बीड.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहुरीतील देवळालीत तिरंगा रॅली दरम्यान...