Sunday, May 19, 2024
Homeधुळेचिलाणेतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

चिलाणेतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

धुळे । Dhule। प्रतिनिधी

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील चिलाणे (Chilane) येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघा संशयीतांवर गुन्हा (crime) दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत मुळ सेंधवा ( जि. बडवाणी, मध्यप्रदेश) व ह.मु चिलाणे (Chilane) येथे राहणार्‍या पिडीत मुलीच्या वडीलांनी शिंदखेडा (Shindkheda) पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या दोन मुली दि. 5 मे रोजी पहाटे बाहेर जावून येतो, असे सांगून गेल्या. मात्र परतल्या नाही.

परिसरात शोध घेवूनही मिळून आल्या नाहीत. त्यानंतर इतर लोकांसह गावातील संशयीत सनी सुरेश भिल व अंकुश धारू यांचा शोध घेतला असता ते देखील मिळून आले नाही. त्यामुळे वरील दोघांनीच मुलींना पळवून नेल्याचा संशय मुलींच्या वडीलांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार वरील दोघांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून तपास एएसआय पानपाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या