Friday, May 3, 2024
Homeनाशिकआजीने दिले नातवास जीवदान

आजीने दिले नातवास जीवदान

सातपूर | Satpur

छोट्या बच्चे कंपनीसोबत मस्ती दंगा करण्याच्या वयातच नऊ वर्षीय बालकाला मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासल्याचे समजताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. कमी वयाच्या रुग्णावर डायलिसिस त्रासदायक व धोक्याचे असल्याने प्रत्यारोपण आवश्यक होते.

- Advertisement -

कुटुंबातील प्रत्येक सदस्याने किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली. इतर सदस्यांची किडनी मॅच न झाल्याने अखेर ५७ वर्षीय आजीने आपल्या नऊ वर्षीय नातवास जीवदान दिले .

सातपूर औद्योगिक वसाहतीतील संदीप प्लास्टिक या कंपनीचे संचालक जी. एस. सावळे यांच्या घरातील ही घटना. आनंददायी जीवन जगत असताना यशराज सावळेला मूत्रपिंडाचा विकार असल्याचे समजताच कुटुंबात चिंता पसरली.

यशराजच्या वर्षभरापूर्वीच दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. कथेटरमधून डायलिसिस सुरू होते. कमी वयाच्या रुग्णावर डायलिसिस त्रासदायक व धोक्याचे असल्याने प्रत्यारोपण आवश्यक होते. अशावेळी मेंदूमृत व्यक्तीची किडनी मिळविण्याकरता वर्ष दोन वर्षाचा कालावधी लागला असता.

पर्याय म्हणून नातेवाइकांनी किडनी दान करावी, असे सुचवले. यावेळी क्षणाचाही विचार न करता त्याचे आजोबा जी. एस. सावळे, वडील दीपक सावळे, आई वैशाली दीपक सावळे यांनी किडनी देण्याची तयारी दर्शवली. मात्र, या तिघांची किडनी जुळली नाही.

यावेळी आजी निर्मला सावळे यांनी नातवाला सर्वसामान्य जीवन जगता यावे, यासाठी किडनी देण्याचा निर्णय घेतला. अखेर नाशिक येथील अपोलो रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया घडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या