Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याVIDEO : अज्ञातवासात असलेले किरीट सोमय्या आले समोर, म्हणाले...

VIDEO : अज्ञातवासात असलेले किरीट सोमय्या आले समोर, म्हणाले…

मुंबई | Mumbai

INS विक्रांत निधी संकलन प्रकरणात सत्र न्यायालयाने भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांचा (Neil Somaiya) अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. (campaign to save aircraft carrier INS Vikrant)

- Advertisement -

मात्र या प्रकरणाची सुनावणी सुरु होण्याआधीच किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील हे बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर आल्या. एकीकडे सोमय्या बेपत्ता होत असल्याचे दावे केले जात असतानाच सोमय्या पहिल्यांदाच समोर आले आहे.

ट्विटरवर (Twitter) व्हिडिओ जारी करत आपल्याविरोधात कितीही आरोप केले तरी आपण दबणार नाही. महाविकास आघाडीचे (MVA) घोटाळे बाहेर काढतच राहू, असे त्यांनी म्हटले आहे. तसचे, INS विक्रांतला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीबाबत उच्च न्यायालयात सर्व माहिती देऊ, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, आपण सध्या कुठे आहोत याची माहिती त्यांनी दिली नाही.

काय म्हणाले सोमय्या?

२०१३ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने (Congress Ncp govt) आयएनएस विक्रांतला (INS Vikrant) सात कोटीत भंगारात विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही निषेध केला. भाजपने १० डिसेंबरला तासाभराचा प्रतिकात्मक निधी संकलनाचा कार्यक्रम केला. यामधून सुमारे ११ हजार रुपये जमले. त्यानंतर भाजपचे खासदार आणि आमदार १७ डिसेंबरला गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखील राष्ट्रपतींना भेटलो. त्यांना ही सर्व माहिती दिली. राज्यपालांना सांगितलं. पण, आज १० वर्षानंतर संजय राऊत सांगतात, की किरीट सोमय्यांना ५८ कोटी रुपये ढापले. चार कंपन्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. यांच्याकडे एक कागद नाही, एक पुरावा नाही. पोलिसांकडे देखील कुठलाही पुरावा नाही. तक्रारदार म्हणतात संजय राऊतांच्या वक्तव्यांमुळे मी आलो आहे. या घोटाळेबाज सरकारचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत किरीट सोमय्या शांत बसणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात जात आहोत. न्यायालयापुढे ही सगळी माहिती सांगणार, असं किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांबाबत महत्वाचा दावा केला आहे. गुजरात (Gujrat) किंवा गोवा (Goa) या भाजपशासित राज्यांमध्येच किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या लपून बसल्याचा दावा राऊतांनी केलाय. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, असंही राऊत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या