Friday, November 22, 2024
HomeराजकीयKirit Somaiya : किरीट सोमय्यांनी नाकारला पक्षादेश; म्हणाले, "अशी अवमानास्पद वागणूक देऊ...

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांनी नाकारला पक्षादेश; म्हणाले, “अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका”

मुंबई | Mumbai

ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तोंडावर भाजपमध्ये बऱ्याच घडामोडी होत असताना दुसरीकडे भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पक्षादेश नाकारत एकच खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार समितीच्या सदस्यपदी किरीट सोमय्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आपण २०१९ पासून पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून ही जबाबदारी नाकारत असल्याचे पत्र किरीट सोमय्या यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) तसेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना लिहिलं आहे.

हे ही वाचा : “भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला, विधानसभेत अजितदादांना ७, तर शिंदेंना….”; रोहितपवारांचा सर्वात मोठा दावा

किरीट सोमय्या पत्रात नेमकं काय म्हणाले?

Dr. Kirit Somaiya Chartered Accountant,
Ph.D Former Member of Parliament
Bharatiya Janata Party

संदर्भ: केएस/मुंबई/02/1566/2024
दि. 10 सप्टेंबर, 2024

प्रिय रावसाहेब,

आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी.

18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपा-शिवसेना यांची ब्ल्यू हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री. उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हा पासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्य / कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे.

मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली होती, माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले तरीही मी जवाबदारी पार पाडली.

गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे.

या विभानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतः ला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतो, करीत राहणार.

आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अश्या प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो.

धन्यवाद !

आपला.
किरीट सोनिया (डॉ. किरीट सोमैया)

श्री. रावसाहेब दानवे
अध्यक्ष
निवडणूक प्रचार समिती
भाजपा, महाराष्ट्र.

प्रत : श्री. चंद्रशेखर बावनकुळे, अध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र.

हे ही वाचा : अमित शाहांसमोर ‘बिहार पॅटर्न’प्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला का?…

किरीट सोमय्या २०१४ मध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. २०१९ मध्ये शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले. त्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामध्ये संजय राऊतांपासून अनिल परब, अनिल देशमुख ते थेट उद्धव ठाकरे यांच्य नावाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. पण पक्षानं मिहीर कोटेच्या यांना तिकीट दिल्यामुळे सोमय्या नाराज असल्याची चर्चा होती.

दरम्यान, भाजपाने जाहीरनामा समिती प्रमुख म्हणून वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, विशेष संपर्क प्रमुख म्हणून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक संपर्क प्रमुख म्हणून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्क प्रमुख म्हणून राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, कृषी क्षेत्र संपर्क प्रमुख म्हणून अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क प्रमुख म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्क प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रचार यंत्रणा प्रमुख म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क प्रमुख म्हणून विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, माध्यम प्रमुख म्हणून आमदार अतुल भातखळकर, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्क प्रमुख म्हणून माजी आमदार भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क प्रमुख म्हणून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, सोशल मीडिया प्रमुख म्हणून आमदार निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माजी खासदार किरीट सोमय्या यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या