Monday, July 15, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीसांचे सोमय्यांच्या त्या व्हिडीओवर महत्वाचे विधान ; म्हणाले, हा विषय..

देवेंद्र फडणवीसांचे सोमय्यांच्या त्या व्हिडीओवर महत्वाचे विधान ; म्हणाले, हा विषय..

मुंबई | Mumbai

- Advertisement -

भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर या व्हिडिओमुळे किरीट सोमय्या अडचणीत आलेत. दरम्यान याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (State Home Minister Devendra Fadnavis) पत्र लिहिलेय.. आणि व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळावी, अशी मागणी केलीय. त्याचवेळी कोणत्याही महिलेवर अत्याचार केला नसल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केलाय. या व्हायरल व्हिडिओमुळे विधानपरिषदेत विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी देखील हा विषय सभागृहात मांडल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा विषय अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे माणसाचे सर्व राजकीय आयुष्य पणाला लागते. माझ्याकडे तक्रारी द्या मी चौकशी करतो. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल. ती महिला कोण आहे, हे जाहीर करणार नाही. मात्र कुणालाही पाठीशी घालणार नाही.

विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला ठाकरे गटाचा ठेंगा; उत्तर न देण्याची भूमिका

पुढे ते असे ही म्हणाले की, “महिलेची ओळख सांगता येत नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही. त्यामुळे ती जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. “सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. याची अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Monsoon Session : मंत्री बिना तयारीने सभागृहात येतात, बाळासाहेब थोरात संतप्त

दरम्यान, विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, “काही लोक ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचे समोर आले आहे. महामंडळात नियुक्त्या देतो, विधानपरिषदेवर घेतो असे सांगितले जाते आणि एक्स्टॉर्शन केले जाते. असच अनेक नेत्यांना देखील ईडी, सीबीआयचे धाक दाखवून पैसै मागितले जातात. अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात काय म्हंटले आहे

किरीट सोमय्या म्हणले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, ”“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या