Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाआयपीएलचा आज डबल बार; 'हे' चार बलाढ्य संघ आमनेसामने

आयपीएलचा आज डबल बार; ‘हे’ चार बलाढ्य संघ आमनेसामने

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज शनिवारी २ डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध यंदाच्या आयपीएल पदार्पणात नव्याने दाखल झालेला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आज दुपारी ३:३० वाजता मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर समोरासमोर असतील. कोलकाता संघावर अधिक दडपण असणार आहे….

- Advertisement -

आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी चौकार मारण्यासाठी कोलकाता सज्ज आहे. मागील ३ सामन्यांमध्ये सलग पराभव पत्कारलेला केकेआर (KKR) आता पराभवाचा चौकार टाळण्यासाठी सज्ज आहे. कोलकाता सातव्या स्थानावर असून, बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी कोलकाता संघाला विजय अनिवार्य असणार आहे.

मागील ३ सामन्यातील सुमार फलंदाजी आणि सुमार गोलंदाजीमुळे कोलकाताचा चौथा पराभव अटळ आहे. तर दुसरीकडे कोलकातावर विजय साकारून विजयी षटकार मारण्यासाठी गुजरात सज्ज आहे. गुजरात सध्या ६ सामन्यांमध्ये ५ विजय आणि १ पराभवासह अव्वल स्थानी आहे.

आपले अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याचा गुजरात संघाचा मानस आहे. गत सामन्यात रशीद खानच्या नेतृत्वात गुजरातने हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत चेन्नईला पराभवाचा धक्का दिला होता. या सामन्यात नियमित कर्णधार हार्दिक पंड्या दुखापतीमुळे सामन्याला मुकला होता. आज कोलकाताविरुद्ध तो संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद दुसरा सामना

आयपीएल १५ मध्ये आज दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (royal challengers bangalore) विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात होणार आहे हा सामना सायंकाळी ७:३० वाजता ब्रेबॉर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी षटकारासह अव्वल दोन संघांमध्ये आपलं स्थान पक्के करण्याचा बंगळूर संघाचा इरादा आहे.

तर दुसरीकडे बंगळुरवर विजय नोंदवून पाचव्या विजयासाठी हैद्राबाद सज्ज आहे. हैद्राबाद आणि बंगळूर आतापर्यंत एकूण २० वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यात हैद्राबादचा दबदबा राहिला आहे.

हैद्राबादने ११ तर बंगळूरने ८ सामन्यात विजय साकारला आहे. मागील ५ सामन्यांच्या निकालांवर नजर टाकल्यास हैद्राबादने ३ तर बंगळूरने २ विजय मिळवले आहेत. आजच्या सामन्यात उमरान मलिक, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, ग्लेन मॅक्सवेल हे स्टार प्लेअर्स ठरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या