Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रKeshavrao Natyagruha : कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक!

Keshavrao Natyagruha : कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक!

कोल्हापूर । Kolhapur

कोल्हापूर शहराच्या सांस्कृतिक वैभवला गुरुवारी धक्का बसला आहे. शहरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह (Keshavrao Natyagruha) अग्नीतांडवामुळे जळून खाक झाले. शॉकसर्टिकमुळे नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे नागरिकांसह कलाकारांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा इतिहास आहे. नाटकाचे अनेक प्रयोग इथे होत असतात. अनेक कलाकार इथे, या नाट्यगृहात घडले आहेत. मात्र या नाट्यगृहाला आग लागल्याने अनेकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. अनेक कलाकार, आमदार घटनास्थळी दाखल झाले. कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह जळताना बघवत नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

अतिशय दुखःद घटना! कोल्हापूर कलाक्षेत्रातला काळा दिवस!! कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासबाग मैदानाला भीषण आग लागली आहे. महाराजांनी रोमच्या थिएटरच्या धर्तीवर उभारलेले हे अत्यंत देखणे नाट्यगृह आणि मैदान हे आमच्या सांस्कृतिक ठेव्याचे एक महत्त्वाचे भाग आहेत. यांचे जळणे पाहून मनाला तीव्र दुःख होत आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाने लोकांना भरपूर दिले; त्यांचा अभाव अधिकच तीव्र आभास देतो. हे पाहणे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या