Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकाल उमेदवारी अर्ज दाखल; आज अचनाक कृष्णराज महाडिकांची माघार, नेमकं काय घडलं?

काल उमेदवारी अर्ज दाखल; आज अचनाक कृष्णराज महाडिकांची माघार, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतून भाजप नेते आणि खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून त्यांनी अर्ज भरला होता, पण आता ते निवडणुक लढणार नाहीये. काल अर्ज दाखल केल्यानंतर कुटुंबीयांचा आशीर्वाद आणि मित्रांच्या सहकार्याने आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. भाजपकडून अजून कोल्हापुरात उमेदवारी निश्चिती झाली नसतानाही कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

गेल्या विधानसभा निवडणुकीतही कृष्णराज महाडिक हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. तसे फलकही लागले होते. परंतु ते रिंगणात उतरले नाहीत. मात्र त्यांनी चार दिवसांपूर्वी नगरसेवकपदासाठीचा उमेदवारी अर्ज नेल्याने चर्चेला उधाण आले. अशातच अजूनही महायुतीचा निर्णय झालेला नसताना आणि भाजपचे तिकीट वाटप झालेले नसताना कृष्णराज यांनी त्यांचा अर्जही दाखल केला. याबाबत पक्षीय पातळीवरून नापसंती व्यक्त करण्यात आल्याचे समजले. त्यामुळे रविवारी सकाळी तातडीने आपण निवडणूक लढवणार नसल्याचे आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचे महाडिक यांना जाहीर करावे लागले.

- Advertisement -

हे ही वाचा: Sanjay Raut: “शरद पवारांचा पक्ष फोडण्यात…”; संजय राऊतांचा गौतम अदाणींवर गंभीर आरोप, म्हणाले…

YouTube video player

काय म्हणाले कृष्णराज महाडिक?
भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात. त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत आहे. महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अशावेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी आणि कोणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही. तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे. यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत इच्छुकांची संख्या खूप जास्त आहे. महायुती एकत्र लढत असल्याने जागावाटप आणि उमेदवार निवड महत्त्वाची आहे. कृष्णराज यांनी माघार घेऊन इतर कार्यकर्त्यांना रिंगणात उतरण्याची वाट मोकळी करून दिली. हा निर्णय पक्षाच्या दीर्घकालीन यशासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. कारण यामुळे नवे चेहरे पुढे येऊन संघटना मजबूत होईल, असा त्यांना विश्वास आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...