Friday, May 3, 2024
Homeनगरकोल्हार उपबाजारात सोयाबीन 7300 तर हरभरा 4500 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात सोयाबीन 7300 तर हरभरा 4500 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल मंगळवार दि. 19 एप्रिल 2022 रोजी सोयाबीनची 7 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रती क्विंटल जास्तीत जास्त 7300 रुपये इतका भाव मिळाला.

- Advertisement -

कोल्हार बुद्रुक उपबाजारात काल मंगळवारी सोयाबीनला जास्तीत जास्त 7300 रुपये भाव मिळाला. याखेरीज गव्हाची 21 क्विंटल आवक झाली. गव्हाला जास्तीत जास्त 2300 रुपये तर कमीत कमी 2200 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2250 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. तसेच हरभर्‍याची 2 क्विंटल आवक झाली.

हरभर्‍यास जास्तीत जास्त 4500 रुपये तर कमीत कमी 4 हजार 465 रुपये इतका भाव मिळाला. हरभर्‍याला सरासरी 4 हजार 480 रुपये इतका भाव मिळाला. मक्याची 4 क्विंटल आवक झाली. मक्याला 1600 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या