Thursday, November 26, 2026
Homeक्राईमBribery News : कोपरगावमध्ये पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात

Bribery News : कोपरगावमध्ये पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 40 हजार रुपयांची लाच (Bribe) मागून ती स्वीकारणार्‍या पोलीस हवालदाराला (Police Constable) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti-Corruption Department) रंगेहात पकडले. गुरुवारी (दि. 26) ही कारवाई सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील देर्डे फाटा (ता. कोपरगाव) येथे करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

तक्रारदार हा शेतकरी असून शेतीसोबतच वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्याला वाळू वाहतुकीची ऑर्डर मिळाल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी वाळू वाहतूक करत असताना पोलीस हवालदाराने त्याचे वाहन अडविले. वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 50 हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Department) करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. यावेळी तडजोडीनंतर दरमहा 40 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार सिन्नर-शिर्डी रोडवरील (Sinnar-Shirdi Road) देर्डे फाटा येथे गुरुवारी पंचांसमक्ष 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार अशोक रामा शिंदे (वय 46) यास पथकाने रंगेहात पकडले.

सदर हवालदाराची नेमणूक शिर्डी शहर वाहतूक शाखेत असून सध्या ते शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

साल्हेरच्या ऐतिहासिक वैभवाचे जतन करून पर्यटन व स्थानिक विकासाला चालना देणार...

0
मालेगाव | वृत्तसंस्था ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याचे वैभव जतन करण्यासोबतच परिसरातील जैवविविधता व नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. साल्हेर परिसराच्या विकास...