कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहरात अवैध गावठी कट्टा बाळगणारा आरोपी अभिषेक सिंग याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व 200 रुपये किमतीचे एक जिवंत कडतुस जप्त केले आहे. त्याच्याविरूध्द कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचेे पो.नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल लोटके, सोमनाथ झांबरे, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे यांचे पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले. पथक कोपरगाव शहरामध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अभिषेक सिंग हा पुणतांबा फाटा, येथे असून त्याचेजवळ विनापरवाना गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली.
पथकाने पुणतांबा फाट्याजवळ सापळा रचून आरोपी अभिषेक उदयनारायण सिंग, रा.टाकळीनाका, निवारा कॉर्नर, कोपरगाव यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 30 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व 200 रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस असा एकुण 30 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं 150/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.