Sunday, May 19, 2024
Homeनाशिककोटक महिंद्रा तर्फे मविप्र संस्थेचा पुरस्काराने गौरव

कोटक महिंद्रा तर्फे मविप्र संस्थेचा पुरस्काराने गौरव

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोना संकटात मराठा विद्या प्रसारक संस्थेने शैक्षणिक कर्तव्याबरोबरच समाजभान जपत अनेकांना मदतीचा हात दिला. या कार्याचि दखल घेत कोटक महिंद्रातर्फ मविप्र संस्थेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

- Advertisement -

संस्थेच्या वतीने सरचिटणीस निलीमाताई पवार, संचालक भाऊसाहेब खातळे यांनी कोटक महिंद्राचे झोनल मॅनेजर नवीन कुमार, अजय कुलकर्णी, विपिन माहेश्वरी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना नीलिमा पवार म्हणाल्या, कोरोनाकाळात पावलोपावली माणुसकी दिसून आली. गरीब-श्रीमंत,स्री-पुरुष असा भेद नाहीसा झाला. कोविड १९ या महामारीने संपूर्ण जगात हाहाकार उडालेला असतांना मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयोगशाळेची उभारणी करून स्वॅब तपासणी तसेच पॉजीटीव्ह रुग्णांवर गेल्या सात महिन्यापासून कोविड रुग्णालयामार्फत अविरत उपचार सुरु आहेत.

बहुजन हिताय, बहुजन सुखाय या धेय्याने स्थापित झालेली व गेल्या १०६ वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील मुख्यत्वे ग्रामीण भागात शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारी मविप्र संस्था आपले बहुमोल योगदान देत असल्याचे सांगुन डॉ. वसंतराव पवार रुग्णालय व फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या टीमने दिलेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले.

यावेळी कोरोना काळात योगदान दिलेल्या डॉ. सुरेश पवार, डॉ. कैचे, डॉ. चावला, डॉ. चोपडा, डॉ. राज नगरकर, उद्धव अहिरे, कमलेश जेठानी, डॉ. सदानंद नायक, मामा ठाकरे, महाराज बिरमानी, आर्की अमृता पवार, योगिता मुंदडा, डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी, डॉ. सरिता औरंगाबादकर, सुनील गांधी आदींचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या