Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनप्रभाससोबत अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; म्हणाली, मी आणि तो...

प्रभाससोबत अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; म्हणाली, मी आणि तो…

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनने फार कमी काळात हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सध्या ती आदिपुरुष या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

क्रिती आणि प्रभास हे आदिपुरूष चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. क्रिती आणि साऊथ सुपरस्टार प्रभासच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.

- Advertisement -

दोघांनीही या चर्चांवर मौन बाळगले होते. अखेर क्रितीने प्रभासच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

क्रिती सनॉन आणि अभिनेता वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला भेडिया हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी क्रिती आणि वरुण एका कार्यक्रमात आले. कार्यक्रमात वरुणने क्रिती आणि प्रभासच्या नात्याबद्दल एक सूचक इशारा दिला.

या कार्यक्रमात वरुणला प्रश्न विचारण्यात आला की क्रितीचे नाव यादीत का नाही? यावर क्रिती म्हणाली, मलाही हेच विचारायचे होते. त्यावर उत्तर देताना वरुण म्हणाला, कारण क्रितीचे नाव कोणाच्या तरी हृदयात आहे. एक व्यक्ती जी सध्या मुंबईत नाही आणि दीपिकाबरोबर शूटिंग करत आहे.

वरुणचे हे बोलणे ऐकून क्रिती हसायला लागली. वरुणने नाव न घेता ज्या व्यक्तीचा उल्लेख केला तो प्रभास होता.

क्रितीने मात्र वरुणच्या वक्तव्यानंतर डोक्याला हात लावला, पण इतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. अखेर क्रितीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत यावर मौन सोडले आहे.

मी आणि तो रिलेशनमध्ये नाही किंवा हे चित्रपटाचे प्रमोशनदेखील नाही. वरुण धवन रिअॅलिटी शोमध्ये जरा जास्तच वाइल्ड झाला आणि लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. त्यामुळे या अफवा पसरल्या.

पण काही माध्यमांनी माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्याआधीच मी या अफवांना पूर्णविराम देते. ही अफवा कशाचाही आधार नसलेली पूर्णतः बेसलेस आहे. त्यामुळे कृपया यावर विश्वास ठेवू नका, असे क्रितीने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या