Sunday, February 15, 2026
Homeक्राईमNewasa : कुकाण्यात गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसांसह तरूणास अटक

Newasa : कुकाण्यात गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसांसह तरूणास अटक

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा पोलिसांनी दमदार कारवाई देशी बनावटीची पिस्टुल बाळगणार्‍या आरोपीस 3 जिवंत काडतुसे, 1 मॅगझीन, एक मालवाहु वाहन असा एकुण 4,50,900/-रु किमतीच्या मुददेमालासह कैले जेरबंद केले आहे. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पोहवा शहाजी आंधळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, कुकाणा गावात नेवासा फाटा ते शेवगाव जाणारे रोडवर कुकाणा दुरक्षेत्रा समोर एक सुझुकी कंपनीच्या गाडीक. एमएच 16 सीडी 4405 मधील एका इसमाकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आहे.

- Advertisement -

पोहया शहाजी आंधळे यांनी त्वरीत मिळालेली माहीती वरिष्टांना कळवून कुकाणा दुरुक्षेत्र येथे दोन पंचांना बोलावून कुकाणा दुरक्षेत्र येथील पोशी अमोल डमाळे, होम बाळु सावंत, होम प्रशांत चव्हाण, होम चंद्रकांत घाडगे, होम श्रीधर लिपणे, अशांचा बोलावून मिळालेल्या माहीती थोडक्यात सांगुन माहितीची खात्री करण्यासाठी कुकाणा येथील तरवडी चौक येथे सापळा रचुन थांबले. मिळालेल्या माहिती प्रमाणे एक मालवाहु वाहन तरवडी चौकात आले असता त्यास आम्ही थांबवून पंचासमक्ष त्यातील चालकाला त्यास त्याचे अंगझडती घेण्याचा कायदेशीर उददेश सांगुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष कारभारी नरोटे (वय. 22 वर्ष रा. मोहरी ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे सांगुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तुल मॅगझीनसह मिळून आले. पंचासमक्ष मॅगझीन खोलुन पाहिले असता त्यामध्ये तीन जिवंत काडतुसे मिळून आले.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तोतया पोलीस निरीक्षक बनून 5 लाखांची खंडणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सामान्य नागरिकांना अटक करण्याची धमकी देत लाखोंची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अहिल्यानगर सायबर पोलिसांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त...