Wednesday, September 30, 2026
Homeक्राईमJamkhed : मुलीला पळविल्याची माहिती दिल्याने एकाचा खून

Jamkhed : मुलीला पळविल्याची माहिती दिल्याने एकाचा खून

जामखेड तालुक्यात खळबळ, एक अटकेत

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

फक्राबाद (ता. जामखेड) येथे मुलीला पळविल्याची माहिती तिच्या आईला दिल्याच्या रागातून 50 वर्षीय व्यक्तीचा चाकू व काठीने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 13) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीचे नाव तुकाराम सुर्यभान काळे (वय 50, रा. फक्राबाद) असे आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा राहुल तुकाराम काळे (वय 25) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. 12) सागर एकनाथ काळे, वैभव एकनाथ काळे व तुळसाबाई एकनाथ काळे (सर्व रा. फक्राबाद) यांनी फिर्यादीच्या घरी येऊन एका महिलेची मुलगी आमचा भाऊ ज्ञानेश्वर एकनाथ काळे याने पळवून नेल्याचे तिच्या आईला का सांगितले? या कारणावरून शिवीगाळ केली व तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. त्यावेळी वाद मिटल्याने तक्रार देण्यात आली नव्हती. शुक्रवारी सकाळी सुमारे 10.30 वाजता फक्राबाद शिवारातील झोपडपट्टी परिसरात तुकाराम काळे यांच्यावर आरोपींनी हल्ला केला.

सागर व वैभव काळे यांनी चाकूने, तर तुळसाबाई काळे यांनी काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपी वाहनावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत तुकाराम काळे यांना खासगी रुग्णवाहिकेतून जामखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Rohit Pawar : गृहखात्याचा पोलिसांवर वचक राहिला नाही; रोहित पवारांचा राज्य...

0
नाशिक | Nashik राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची (Law and Order) परिस्थिती गंभीर बनली असून, गृहखात्याचा पोलिस (Police) प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नाही, असा आरोप राष्ट्रवादी...