Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकुंदेवाडी रेल्वेफाटक 'या' कालवधीत राहणार बंद

कुंदेवाडी रेल्वेफाटक ‘या’ कालवधीत राहणार बंद

निफाड। प्रतिनिधी Niphad

निफाड-सुरत-शिर्डी महामार्गावरील कुंदेवाडी या मध्य रेल्वे स्थानकावरील क्रमांक 99 रेल्वे फाटकाचे रेल्वे विभागाच्या वतीने उद्या शनिवार (दि.19) ते सोमवार (दि.21) ऑक्टोबर पर्यंत दुरुस्तीचे कामकाज होणार असल्याने दररोज सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फाटक रेल्वे विभागाच्या कामकाजासाठी बंद राहणार असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बंद असणार आहे.

- Advertisement -

परिसरातील वाहनधारकांनी तसेच गुजरातहून येणार्‍या साई भक्तांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत निफाड वरून जाणार्‍या सर्व नागरिकांनी या मार्गाने या वेळेत येवू नये, असे आवाहन मध्य रेल्वे विभागाच्या कुंदेवाडी रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यासाठी पिंपळगाव, गुजरातकडे जाण्याचा मार्ग नागरिकांनी निफाड वरून शिवडी, उगाव, नांदुर्डी, खेडे, पंचकेश्वर मार्गे पिंपळगावकडे तसेच औरंगाबाद-नाशिक महामार्गावरून निफाड मार्ग कोठुरे फाटा, पिंपरी, कादवा नदीवरील पातळी पूल ओलांडून पिंपळगावकडे जावे, असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...