Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारटॉवरवरून पडल्याने मजूराचा मृत्यू

टॉवरवरून पडल्याने मजूराचा मृत्यू

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

तालुक्यातील भोणे येथील सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरुन पडल्याने मजूराचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.

- Advertisement -

धनादेश अनादरप्रकरणी व्यापाऱ्यास ५९ लाखांचा दंड ; एक वर्ष साधा कारावास

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, तालुक्यातील भोणे येथे उभारण्यात आलेल्या सुझलॉन कंपनीच्या टॉवरवर आज सायंकाळच्या सुमारास कंत्राटदाराकडून मेंटेनन्सचे काम सुरु होते. यावेळी एक मजूर विनासुरक्षा टॉवरवर चढला. मात्र, त्याचा अचानक तोल गेल्याने तो सरळ जमिनीवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

- Advertisment -

ताज्या बातम्या