Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशभारताचे मोठे यश : चीन सीमेवर सहा पहाडांवर ताबा

भारताचे मोठे यश : चीन सीमेवर सहा पहाडांवर ताबा

नवी दिल्ली

मागील २० दिवसांपासून चीन पूर्वी लडाखमधील चीन सीमेवर भारतीय सैनिकांनी मोठे यश मिळवले आहे. या भागातील ‌‌उंच ठिकाणी भारतीय सैनिकांनी ताबा मिळवला आहे.

- Advertisement -

भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान कोंगरूंग नाला, गोगरा आणि पँगाँग तळ्याचा फिंगर भाग या ठिकाणी एप्रिलपासून संघर्षाचे वातावरण आहे. पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांवर भारतीय सैनिक वरचढ ठरले आहे. गेल्या तीन आठवड्यात ६ ‌उंच पहाडांवर भारतीय सैनिकांनी ताबा मिळवला आहे. यामुळे उंच ठिकाणांवरुन भारतीय सैनिका चीनी सैनिकांवर नजर ठेऊ शकणार आहे. ज्या पहाडांवर भारतीन सैनिकांनी ताबा मिळवला, ते पाहड रिकामे होते. त्यात फोटो

सेनामधील मगर हिल, गुरुंग हिल, रेचेन ला, रेजांग ला, मोखपारी व फिंगर ४ जवळील पाहाडाचा समावेश आहे. चीनी सैनिक या पाहाडांवर कब्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. भारतीय सैनिकांना त्याची माहिती मिळताच त्यावर त्वरित पावले उचलत ताबा मिळवला.

पँगाँग तळ्याच्या दक्षिण काठावर चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न २९ ते ३१ ऑगस्टच्या दरम्यान भारतीय लष्कराने हाणून पाडला, तेव्हा चिनी सैन्याने प्रथमच गोळीबार केला. गोळीबाराची दुसरी घटना सात सप्टेंबरला मुखपारी शिखरांच्या परिसरात घडली. तिसर्‍या घटनेवेळी आठ सप्टेंबरला पँगाँग तळ्याच्या दक्षिण काठावर दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी सुमारे १०० गोळ्या झाडल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या