Monday, January 12, 2026
Homeक्राईमAhilyanagar : कारचा विमा नसणे मालक-चालकाला पडले महागात

Ahilyanagar : कारचा विमा नसणे मालक-चालकाला पडले महागात

मयताच्या वारसांना 94.46 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विमा नसलेल्या वाहनाच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना तब्बल 94 लाख 46 हजार 454 रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी दिले आहेत. वाहनाचा विमा नसल्याने ही संपूर्ण रक्कम कार मालक व चालकानेच भरावी, असा स्पष्ट निर्णय न्यायालयाने दिल्याने वाहनधारकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील रहिवासी सुनील शिरसाठ हे संगमनेर तालुक्यात कारमधून प्रवास करत असताना वडगाव पान टोलनाक्याजवळ अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले होते. संबंधित कार ही रमेशचंद्र हेमराज गोहिल यांच्या मालकीची असून, त्यांचा मुलगा मुकेश गोहिल हा कार चालवत होता. या अपघातप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मयत सुनील शिरसाठ यांच्या पत्नी व अन्य वारसांनी अहिल्यानगर येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे अपघाती मृत्यूबाबत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली.

YouTube video player

मयत सुनील शिरसाठ हे श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये सेवेत असल्याने त्यांच्या नियमित उत्पन्नाचा विचार करून न्यायालयाने 53 लाख 87 हजार 720 रूपये नुकसानभरपाई निश्चित केली. त्यावर दावा दाखल केल्याच्या तारखेपासून वारसांना रक्कम मिळेपर्यंत 8 टक्के दराने व्याज देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. व्याजासह एकूण रक्कम 94 लाख 46 हजार 454 रूपये इतकी ठरते. सदर दावा सुरू असतानाच कारचे मालक रमेशचंद्र गोहिल यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वारस लीलाबेन, दुर्गेश, जागृती, दीप्ती व मुकेश गोहिल यांच्यावर नुकसानभरपाई भरण्याची जबाबदारी न्यायालयाने निश्चित केली आहे. मयत सुनील शिरसाठ यांच्या वारसांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. गोरक्ष पालवे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अ‍ॅड. गुरविंदर पंजाबी, सागर गरजे, रोहित बुधवंत, राहुल दहिफळे, विशाल वांढेकर, धनश्री खेतमाळीस आदींनी साहाय्य केले.

ताज्या बातम्या

Rahuri : उसाला तुरे आल्याने तोडणी मजुरांकडून आर्थिक लूट; शेतकरी दुहेरी...

0
आरडगाव |वार्ताहर| Aradgav राहुरी तालुक्यात सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून ऊस तोडणीला वेग आला आहे. मात्र हा वेग शेतकर्‍यांसाठी दिलासादायक ठरण्याऐवजी आर्थिक अडवणूक...