Tuesday, May 5, 2026
Homeनाशिकबस-रिक्षा अपघातात तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू, चार जण जखमी

बस-रिक्षा अपघातात तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू, चार जण जखमी

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

अंजनेरी शिवारात आज सकाळी झालेल्या अपघातात तीन वर्षीय बालिका ठार झाली. त्र्यंबकेश्वर हून नासिक कडे जाणाऱ्या बस( Mh 14 BT 2719 )वर नाशिकहून त्र्यंबकेश्वर कडे भाविकांना घेऊन येणारया रिक्षाचे (MH 15 ES 1137) टायर फुटल्याने रिक्षा बस वर आदळली.

- Advertisement -

अपघातात रिक्षातील चार प्रवासी जखमी झाले यात तीन वर्षीय बालिका इशा राजेश विश्वकर्मा ही ठार झाली. यात्रेकरूंना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरीत जखमी यात्रेकरूंची नावे अद्याप समजू शकली नाहीत . सदर यात्रेकरू ठाणे येथील असल्याची माहिती समजते. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...