Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो'चा समारोप

‘देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’चा समारोप

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकरोड व परिसरातील नागरिकांच्या प्रतिसादात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित व ‘ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ प्रायोजित ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो 2026’चा शानदार समारोप करण्यात आला.

प्रदर्शनाच्या तीनही दिवस परिसरातील नागरिकांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली. पर्यावरणीय पार्टनर पपायज नर्सरी हे होते. सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एक्स्पोला श्री शुभ एडवर्टाइजिंगचे संचालक महेश कलंत्री, नाशिकरोड वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष सुनील मगर, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, माजी कार्याध्यक्ष अनिल कुलथे, कर सल्लागार अंकुश सोमाणी, अरुण जुन्नरे यांनी भेट दिली.

नाशिककरांचे विश्वासू बांधकाम व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळालेले ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी आपले अत्यंत अत्याधुनिक सुविधा असलेले प्रशस्त गृह व व्यावसायिक प्रकल्प नाशिकरोड आणि परिसरात सादर केले आहेत. ग्राहकांना हे प्रकल्प नक्की आवडतील असा विश्वास संचालक अभय जैन यांनी व्यक्त केला, तसेच ग्राहकांनी या प्रकल्पांना नक्की भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

एक्स्पो दरम्यान सीडीआयएलच्या महालक्ष्मी नगर , 6 नंबर नाका लॅम रोड येथील लक्ष्मीपुष्प या एन. ए. पप्लॉटची बुकिंग झाली आहे. या ठिकाणी उत्तम कनेक्टिव्हिटी असून, सर्व जीवनावश्यक सोई सुविधा वॉकिंग डिस्टन्स वर आहेत. गेटेड कम्युनिटीचा हा सुंदर गृहप्रकल्प आहे. अनेक अत्याधुनिक अमेनेटीज येथे देण्यात येणार आहेत. ग्राहकांनी या प्रकल्पाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन सीडीआयएल रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक व टीमने केली आहे.

Displaying 1768145612160.jpg
Displaying 1768145612109.jpg

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये उद्यापासून होणार पाणी कपातीची अंमलबजावणी

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय १७ जुलै रोजी घेतला असून...