Saturday, January 24, 2026
Homeदेश विदेशSonam Wangchuk: लडाख पोलिसांचा सोनम वांगचूकबाबत धक्कादायक खुलासा; पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात, बांगलादेश...

Sonam Wangchuk: लडाख पोलिसांचा सोनम वांगचूकबाबत धक्कादायक खुलासा; पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात, बांगलादेश दौराही केला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी लेहमध्ये हिंसक आंदोलन झाले ज्यात चौघांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले. लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले. लेहमध्ये बुधवारी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान यानंतर आज (शनिवार) लडाखचे पोलीस महासंचालक एस. डी. सिंग जामवाल यांनी वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असणे आणि भारताच्या शेजारच्या देशांना दिलेल्या भेटींबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखची राजधानी लेहमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे लडाखपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे. हिंसक आंदोलनाच्या दोन दिवसांनंतर शुक्रवारी पोलिसांनी सोनम वांगचुक यांना अटक करुन जोधपूर तुरुंगात आणले. आता लडाख पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्याबाबत नवीन खुलासा केला आहे.

- Advertisement -

डीजीपी जामवाल यांनी काय सांगितले
लेह येथे आयोजित पत्रकार परिषदेत डीजीपी जामवाल यांनी सांगितले की, पोलिसांनी एका पाकिस्तान पीआयओ (इंटेलिजन्स ऑफिसर) ला अटक केली आहे, जो कथितपणे वांगचुक यांच्या संपर्कात होता. “आम्ही काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी पीआयओला अटक केली होती, जो तिकडे माहिती पुरवत होता. आमच्याकडे याचे रेकॉर्ड आहे. ते (सोनम वांगचूक) पाकिस्तानमध्ये डॉन (वर्तमानपत्र)च्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी बांगलादेशला देखील भेट दिली. त्यामुळे, त्यांच्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. याप्रकरणी तपास केला जात आहे,” असे लडाखचे डीजीपी म्हणाले.

YouTube video player

तसेच पुढे बोलताना २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारात वांगचुक यांनी हिंसाचार भडकावल्याचा आरोपही जामवाल यांनी केला. या घटनेत आंदोलकांनी हिंसाचार आणि जाळपोळ करून स्थानिक भाजपाचे कार्यालय आणि काही वाहनांना आग लावल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास ८० जण जखमी झाले होते.

लेह हिंसाचारात कोणत्याही देशविरोधी घटकांचा सहभाग आहे का असे विचारले असता एस.डी .सिंग जामवाल म्हणाले की, “हा तपासाचा विषय आहे. पण जखमींना रुग्णालयात नेण्याच्या पहिल्याच दिवशी, गोळीबारात जखमी झालेल्या २-३ नेपाळी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या माहितीनंतर, असे आणखी २-३ प्रकार समोर आले आहेत. तीन नेपाळी नागरिकांची ओळख पटली आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो-२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik दैनिक ‘देशदूत’ आयोजित आणि गंगापूर रोड व परिसरातील गृहप्रकल्पांवर आधारित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चा दुसरा दिवस नाशिककरांच्या गर्दीने आणि उत्साहाने...