Friday, September 20, 2024
Homeनगर‘लाडकी बहीण’ योजनेचा श्रीगोंद्यात बोजवारा

‘लाडकी बहीण’ योजनेचा श्रीगोंद्यात बोजवारा

दाखल करण्यासाठी दिलेले अर्ज गायब

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पाहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पाठवले, पण यानंतर दुसर्‍या टप्प्यात श्रीगोंदा पालिकेकडे आलेले अर्ज 15 दिवसांनंतरही भरले गेले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना अर्ज देऊनही कुठलेच मेसेज आले नसल्याने पालिकेच्या कर्मचार्‍यांकडे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. अनेक अर्ज सापडत नाहीत तर नक्की कुणाकडे अर्ज ऑनलाईन भरायला दिले याचीही माहिती लाडक्या बहिणींना मिळायला तयार नाही.

सध्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास तिसर्‍या टप्प्यात मुदत वाढ दिली असली तरी श्रीगोंदा पालिकेने लाडकी बहीण योजनेचे घेतलेले अर्ज वेळेत भरले नसल्याने अनेक लाडक्या बहिणीचे दुसर्‍या टप्प्यात आलेले अर्ज नक्की कुठे गेले आणि ज्या पालिकेच्या कर्मचारी आणि तात्पुरते नेमलेल्या कर्मचार्‍यांना हे काम दिले ते काय करत आहेत, असा प्रश्न माहिलांकडून विचारला जात आहे. श्रीगोंदा शहरातील अनेक माहिलांनी आपले अर्ज पूर्ती करून मागील महिन्यात अर्ज श्रीगोंदा पालिकेत जमा केली; पण त्या अर्जानंतर लाभार्थ्यांना कुठलेच मॅसेज आले नाहीत.

यामुळे आपल्या अर्जाचे नेमके काय झाले याची माहितीही पालिकेचे तात्पुरते नेमलेल्या कर्मचारी देत नाहीत. तर ज्या पालिकेच्या कर्मचार्‍यांकडे हे काम दिले ते ही या कामात चालढकल करत आहेत. काही अंगणवाडी सेविका यांना हे अर्ज भरण्यासाठी पालिकेने दिले पण भरले नाहीत अशी माहिती ही मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या