Tuesday, February 3, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्वाची बातमी! नोव्हेंबर-डिसेंबर हफ्त्याची संभाव्य तारीख...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्वाची बातमी! नोव्हेंबर-डिसेंबर हफ्त्याची संभाव्य तारीख समोर

मुंबई । Mumbai

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. डिसेंबर महिना आता संपायला अवघे पंधरा दिवस उरले असल्यामुळे, दोन महिन्यांचे हे पैसे एकत्रितपणे जमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

योजनेच्या नियमानुसार दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र, नोव्हेंबरचा हप्ता अद्याप न मिळाल्याने, आता महिलांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे मिळून ३००० जमा होण्याची शक्यता आहे. ही रक्कम याच आठवड्यात जमा होऊ शकते, असे सध्या बोलले जात आहे.

YouTube video player

राज्यात लवकरच नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. त्यामुळे, नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, या संदर्भात शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पुढील हप्ता नियमितपणे मिळवण्यासाठी महिलांना केवायसी (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर वेळेत ई-केवायसी पूर्ण झाले नाही, तर योजनेचा लाभ बंद केला जाऊ शकतो. महिलांसाठी केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. त्यासाठी आता केवळ पंधरा दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

दरम्यान, ज्या महिलांच्या केवायसीमध्ये काही चुका झाल्या आहेत, त्यांना त्या सुधारण्याची एक संधीही देण्यात आली आहे. यासाठी महिलांना योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आवश्यक दुरुस्ती करायची आहे. लाखो महिलांचे लक्ष आता सरकार कधी अधिकृत घोषणा करते आणि त्यांच्या खात्यात ₹३००० जमा होतात याकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित दादांसारख्या लोकनेत्याला कायमचा मुकलो; शोकसभेत सर्वपक्षीय...

0
नाशिक | Nashik स्व.अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लोकनेत्याला कायमचे मुकले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यात कुठलीही...