Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : सप्टेंबरचा हफ्ता कधी ?; मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या…

Ladki Bahin Yojana : सप्टेंबरचा हफ्ता कधी ?; मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojan) लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्र मिळाले होते. प्रत्येकी दीड हजार रुपये प्रतिमहिना असलेला लाभ महिलांच्या खात्यात एकत्र जमा झाला होता. रक्षाबंधनानंतर गणेश चतुर्थी झाली, गणपती बाप्पा विराजमान झाले आणि निघालेही. आता पुढचा हफ्ता कधी येणार याकडे सर्वसामान्य महिलांचे डोळे लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojan) अंतर्गत निधी मिळवण्यासाठी राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज केले आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमाही झाले आहेत. मात्र अर्ज करण्यास विलंब झालेल्या महिला संभ्रमात आहेत. ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यांत अर्ज भरले होते, त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसेही लवकरच मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्या महिलांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची कठोर छाननी सुरु आहे अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Women and Child Welfare Minister Aditi Tatkare) यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या