Wednesday, July 24, 2024
HomeनाशिकNashik Crime News : स्कूटरच्या डिक्कीतून 'इतक्या' लाखांची रोकड लंपास

Nashik Crime News : स्कूटरच्या डिक्कीतून ‘इतक्या’ लाखांची रोकड लंपास

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

- Advertisement -

नाशिकरोड परिसरात असलेल्या विहितगाव (Vihitgaon) सौभाग्यनगर येथील बीजी पब्लिक स्कूल समोर पार्किंग केलेल्या स्कूटरच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने तब्बल साडेसात लाख रुपये (Seven and a half lakh rupees) चोरून (Stolen) नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

Nashik News : फुलांच्या खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी; झेंडूचा भाव वाढला

याबाबत अधिक माहिती अशी की, भगत प्रभुदास प्रेमजी हे व्यापारी असून त्यांनी आपल्या स्कूटरच्या डिक्कीत पाचशे रुपयांच्या १०० नोटा असलेल्या ५० हजारांचा प्रत्येकी एक बंडल असे एकूण १५ बंडल ठेवले होते. प्रेमजी हे सदरची स्कूटर बीजी हायस्कूल (BG High School) सौभाग्यनगर विहितगाव येथे पार्किंग करून काही कामासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेत स्कूटरच्या डिक्कीचे लॉक तोडून डिकीमधील साडेसात लाख रुपये चोरून नेले. यानंतर काही वेळाने प्रेमजी हे आपल्या गाडीजवळ आले असता त्यांना गाडीच्या डिक्कीचे लॉक तुटल्याचे आढळले व त्यातील साडेसात लाखांची रक्कम गायब झाल्याचे समजले.

IND vs NED : आज भारत-नेदरलँड सामना; टीम इंडियात होणार बदल,’या’ दोन खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

दरम्यान, त्यानंतर प्रेमजी यांनी शोधाशोध सुरू केली परंतु चोरट्यांचा सुगावा लागू शकला नाही. या घटनेनंतर भगत प्रेमजी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) जात तक्रार दाखल केली. तसेच या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी (Police) अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विंचू करत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या